Ek Hota Malin Movie : तब्बल 12 वर्षांनंतर माळीण गावचं रहस्य उलगडणार; डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाची कहाणी ‘एक होतं माळीण’!

राज्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, डोंगर – दऱ्या वाहून जाणे हे काही नवीन नाही. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपाचे असे काही अनुभव आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीतच नाही तर नाहिसे झाले आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना म्हणजे माळीण गावाची. राज्यात झालेल्या अशाच एका मुसळधार पावसात संपूर्ण गावचं गायब झाल्याची घटना १२ वर्षांपूर्वी घडली होती. ते गाव म्हणजे […]

Ek Hota Malin Movie : तब्बल 12 वर्षांनंतर माळीण गावचं रहस्य उलगडणार; डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाची कहाणी ‘एक होतं माळीण’!

राज्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, डोंगर – दऱ्या वाहून जाणे हे काही नवीन नाही. मात्र निसर्गाच्या रौद्र रुपाचे असे काही अनुभव आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीतच नाही तर नाहिसे झाले आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना म्हणजे माळीण गावाची. राज्यात झालेल्या अशाच एका मुसळधार पावसात संपूर्ण गावचं गायब झाल्याची घटना १२ वर्षांपूर्वी घडली होती. ते गाव म्हणजे माळीण. संपूर्ण गावच ढिगाऱ्यात गाडले गेलेल्या गावाची घटना एसटी बसच्या कंडक्टरमुळे समोर आली होती. या दुर्घटनेत 40 कुटुंबातील 151 लोकांचा मृत्यू, तर 9 जण जखमी झाले आहेत. सलग 8 दिवस ढिगाऱ्याचे खोदकाम करून त्यातून 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 8.50 लाखांची मदत देण्यात आली होती. ही घटना इतकी विदारक होती की राज्यातील प्रत्येक माणूस या घटनेने सून्न झाला होता. अशातच आता या दुर्घटनेवरील वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

हेही वाचा : Pranit More Controversy : एक वाद संपत नाही तोच दुसरा पेटला! बिर्याणीनंतर MBBS विद्यार्थिनीचा पुरुष मृतदेहाच्या खाजगी अवयवांवरील टिप्पणी व्हायरल

चित्रपटसृष्टीत आजवर न पाहिलेला थरार ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे लेखक, संवाद, दिग्दर्शनाची बाजू दत्ता गायकर आणि राजू राणे यांनी सांभाळली आहे. तर याची निर्मिती संतोष जे. म्हात्रे यांनी केली आहे. चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजीत श्वेताचंद्र, कै. रामचंद्र धुमाळ, अनिल नगरकर, सिद्धी पाटणे, अक्षय म्हात्रे, प्रशांत तपस्वी, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number