‘विषय राजकारणाचा नाही अस्तित्वाचा आहे’ – पंकजा मुंडे

ओबीसी  आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट केले की, ‘ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सम्मानीय सर्वोच्च […]

‘विषय राजकारणाचा नाही अस्तित्वाचा आहे’ – पंकजा मुंडे

ओबीसी  आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केले की, ‘ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सम्मानीय सर्वोच्च न्यायलयाकडून स्थगित झाला आहे, ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट नाही झाली हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरीही घ्यावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विट करत केली आहे.’

ओबीसीची झालेली हानी भयंकर आहे. यात मार्ग निघालाच पाहीजे. विषय राजकारणाचा नाही विषय अस्तित्वाचा आहे. दोषारोप नको मार्ग काढा, असेही पंकजा मुंडे ट्विट करत म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number