‘पंतप्रधानांनी अचानक मार्गात बदल केला’ – रणदीप सिंह सुरजेवाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली. याप्रकरणी सर्वस्तरावरून पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधानांनी अचानक आपल्या मार्गात […]

‘पंतप्रधानांनी अचानक मार्गात बदल केला’ – रणदीप सिंह सुरजेवाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली. याप्रकरणी सर्वस्तरावरून पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

मात्र, पंतप्रधानांनी अचानक आपल्या मार्गात बदल केला असल्याचा आरोप क्राँग्रेसवतीने करण्याता आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधानांनी मार्गात बदल केला असल्याचा आरोप केला आहे.

रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी १०,००० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजीसुद्धा घेण्यात आली तर भाजप कार्यकर्त्यांच्या बस ज्या मार्गाने येणार होत्या त्याचीही खबरदारी घेण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांनी ऐनवेळी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय रद्द करत रस्त्याने येण्याचा निर्णय केला. त्यामुळे पंतप्रधानांनी अचानक आपल्या मार्गात बदल केल्याचा आरोप रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच सुरजेवाला यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसंबंधी पंतप्रधानांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सभा घ्या, परंतु त्याचसोबत शेतकऱ्यांचेही ऐका असेही सुरजेवाला म्हणाले आहेत.

‘काँग्रेस पंतप्रधानांची इतकी घृणा का करते?’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस, पंतप्रधानांची किती घृणा करते हे यातून दिसत आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचे काही प्रोटोकॉल असतात, ते का पाळले गेले नोही, असा प्रश्नसुद्धा स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number