प्रवासी भारतीय दिवस संमेलन सोमवार पासून सुरू झाले आहे. हे संमेलन 10 जानेवारीपर्यंत चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रवासी भारतीय संमेलन झालेले नाही. त्यामुळेच यावेळची ही परिषद विशेष ठरण्याची अपेक्षा आहे. हे संमेलन मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत 400 हून अधिक लोक इंदूरला पोहोचले आहेत. सर्व पाहुण्यांना इंदूरच्या स्टार्टअप्सची ओळख करून देण्यासाठी हे संम्मेलन आयोजित केले आहे.प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या खास दिवसाच्या निमित्ताने इंदूरमध्ये या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
संमेलनाला स्वत:नरेंद्र मोदींनी हजेरी लावली आहे. या संमेलनामध्ये उपस्थितीतांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की संमेलनामध्ये 70 देशांमधील अनिवासी भारतीय सामील झाले आहेत. तब्बल चार वर्षानंतर प्रवासी भारतीय दिवस एवढ्या मोठ्या स्वरुपात साजरा केला जात आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर येथे हे संमेलन पार पडत आहे. मोदींनी म्हटले आहे की, लोक म्हणतात इंदौर एक शहर आहे पण मला वाटते की इंदौर एक काळ आहे. जो पुढे तर जातो मात्र आपल्या परंपरा जपून ठेवतो.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी परदेशातल्या नागरिकांना उद्देशून तुम्ही धरतीवर भारताचे राष्ट्रदूत आहात असे वक्तव्य केले आहे. यावर्षी भारत G20 संघटनेचे प्रतिनिधित्व आहे. जगासोबत नव्याने संबंध जोडण्याची , स्वत:ची भूमिका मांडण्याची भारताकडे मोठी संधी असल्याचे म्हटले जात आहे.