भाजपमध्ये पद ही शोभेची बाब नाही – देवेंद्र फडणवीस

आपल्या पक्षात कोणतीही गोष्ट वारशाने मिळत नाही. आपल्या पक्षात ती गोष्ट मेहनतीने कमवावी लागते. आपला कार्यकर्ता, पदाधिकारी मेहनतीवर मोठा होतो. त्यामुळे आज अनेकांना पद मिळाली असतील. पण भाजपमध्ये पद ही शोभेची बाब नाही आहे. नवी मुंबईमध्ये भाजपच्या महावअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळेस विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपमध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे. केवळ […]

भाजपमध्ये पद ही शोभेची बाब नाही – देवेंद्र फडणवीस

आपल्या पक्षात कोणतीही गोष्ट वारशाने मिळत नाही. आपल्या पक्षात ती गोष्ट मेहनतीने कमवावी लागते. आपला कार्यकर्ता, पदाधिकारी मेहनतीवर मोठा होतो. त्यामुळे आज अनेकांना पद मिळाली असतील. पण भाजपमध्ये पद ही शोभेची बाब नाही आहे.

नवी मुंबईमध्ये भाजपच्या महावअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळेस विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस बोलत होते.

भाजपमध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे. केवळ मिरवण्याकरिता, पाटी लावण्यासाठी,  कार्ड छापण्याकरता, प्रभाव पाडण्यासाठी भाजपमध्ये पदाची निर्मिती केली जात नाही.

भाजप एक उपकरण आहे. आम्हाला सत्ता फक्त भोगण्याकरता नको आहे. आमच्या करता सत्ता म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे.

आमचा पक्ष हा, या सामाजिक आणि आर्थिक लढाईमध्ये आमचं उपकरण आहे. तर या उपकरणाचं इंधन म्हणजे कार्यकर्ता असल्याचंही फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number