देशात शनिवारपासून ४१ हजार ५०६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे . याच कालावधीत देशात ४१ हजार ५२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे असे दिसून येत आहे . ३५ हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा ४५ हजारांच्या पुढे गेली होती. मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे.
देशाचा सध्याचा रिकव्हरी रेट ९७.२० टक्के इतका आहे. भारताचा पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३२ टक्के इतका आहे. देशाचा सध्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. सलग विसाव्या दिवशी देशाचा दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.