The Maharashtra Files movie: फाईल्समध्ये दडलेलं सत्य बाहेर येताच संपूर्ण व्यवस्था हादरणार…; ‘द महाराष्ट्र फाईल्स ’ देणार वास्तवाला जबरदस्त धक्का

‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट शासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि एका शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कथा मांडतो.

The Maharashtra Files movie: फाईल्समध्ये दडलेलं सत्य बाहेर येताच संपूर्ण व्यवस्था हादरणार…; ‘द महाराष्ट्र फाईल्स ’ देणार वास्तवाला जबरदस्त धक्का

The Maharashtra File movie: शासकीय यंत्रणेमधील भ्रष्टाचार, राजकीय दबाव आणि सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या सगळ्याच वास्तवाला भिडणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर आल्यानंतरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, या कथानकाबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

हा चित्रपट केवळ एका कुटुंबाची गोष्ट सांगत नाही, तर व्यवस्थेतील अनेक न उघडलेले पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतो. सरकारी कार्यालयांमध्ये काम अडकवणे, दलालांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणे, आणि न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणे या सर्व गोष्टींचं वास्तववादी चित्रण या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. विशेषतः शेतकरी कुटुंबाच्या संघर्षावर आधारित असलेली ही कथा समाजातील अनेकांना स्वतःचीच कहाणी वाटू शकते.

हेही वाचा: Ram Gopal Verma : थलपतीच्या 'विजया'नंतर राम गोपाल वर्मांची 'ती' पोस्ट; करुणानिधींच्या फोटोसह केली बेधडक टिप्पणी

चित्रपटात ‘फाईल्स’ हा केवळ कागदांचा गठ्ठा नसून, त्या मागे दडलेली सत्य परिस्थिती उघड करणारा महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा ही फाईल उघडली जाते, तेव्हा फक्त एखादं प्रकरणच नाही तर संपूर्ण यंत्रणेलाच हादरा बसतो, असा प्रभावी संदेश या सिनेमातून दिला जाणार आहे. त्यामुळेच हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच समाजाला विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन आणि पटकथा अशी सर्व जबाबदारी संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर शालिनी राठोड या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माती म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय आर्यन राठोड यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून योगदान दिलं आहे. चित्रपटाच्या प्रत्येक घटकात वास्तवाची झलक दिसावी यासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: Trisha Krishnan Viral Video: आधी मंदिरात प्रार्थना, त्यानंतर थेट विजयला भेटायला पोहोचली तृषा; व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

कलाकारांच्या बाबतीतही हा सिनेमा खूपच दमदार ठरणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात दिसणार आहे. उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे यांसारख्या दमदार कलाकारांसोबतच सन्नी लिओनी, सपना चौधरी, गौतमी पाटील यांचाही सहभाग या सिनेमात आहे. त्यामुळे विविध शैलींचं मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. कथानकाला साजेसं संगीत आणि पार्श्वसंगीत सिनेमाच्या प्रभावात भर घालणार आहे. 29 मे 2026 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, सामाजिक विषयांवर आधारित सिनेमांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा एक महत्त्वाचा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ केवळ कथा नाही, तर व्यवस्थेवर भाष्य करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा एक प्रभावी प्रयत्न ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number