ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला बळी

देशातील कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावत असताना दुसरीकडे आता ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रुग्णाला ओमयाक्रॉन विषाणूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटही जीवघेणा […]

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला बळी

देशातील कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावत असताना दुसरीकडे आता ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रुग्णाला ओमयाक्रॉन विषाणूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारतातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. तसेच दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३७वर पोहचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता प्रशासन चिंतेत आले असून खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number