रशिया-युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खनिजे, खाद्यतेलासह संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यापासून कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. तर रशिया-युक्रेन युद्ध सरूच असल्यामुळे या आठवड्यातही शेअर बाजारावर संकट कायम असून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सेन्सेक्समध्ये […]

रशिया-युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खनिजे, खाद्यतेलासह संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यापासून कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. तर रशिया-युक्रेन युद्ध सरूच असल्यामुळे या आठवड्यातही शेअर बाजारावर संकट कायम असून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण होत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची घसरण झाली आहे तर निर्देशांक १.३१ टक्क्यांची घसरण झालेली आहे. तसेच निफ्टीत १.२७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून हा निर्देशांक १६,५००च्या खाली उघडला आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यतेलाच्य किंमतीमध्ये वाढ होणार आहे. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाच्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. मात्र, सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे कच्च्या तेलाची आयात थांबण्याची शक्यता असल्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number