देहूचे मंदिर एकच दिवस राहणार बंद

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या स्वागतासाठी देहू संस्थान सज्ज झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस नाही तर एकच दिवस बंद राहणार आहे. देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूमध्ये येणार आत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा […]

देहूचे मंदिर एकच दिवस राहणार बंद

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या स्वागतासाठी देहू संस्थान सज्ज झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस नाही तर एकच दिवस बंद राहणार आहे.

देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूमध्ये येणार आत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरां लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी मंदीर तीन दिवस बंद करण्यात आला होता. मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला असून देहूचे मंदीर एकच दिवस बंद राहणार आहे. तसेच भक्तांसाठी मूखदर्शन सुरू असणार असल्याचा निर्णय देहू संस्थानाने घेतला आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १४ तारखेला मोदींच्या भेटीनंतर २० जूनला पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू देवस्थानची लगबग दिसून येत आहे. दरम्यान सुरक्षेसाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी आता फक्त मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले असून भक्तांना मंदिरात जाऊन देवाचे चरणस्पर्श करता येणार नाही आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number