ताडोबातील वयोवृद्ध वाघाचा मृत्यू

चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा मृत्यू झाला. वाघडोह वाघाचा सिनाळा नर्सरी जवळ नैसर्गिक मृत्यू झाला. काही महिन्यांपासून हा वाघ अशक्त असल्याची माहिती वनविभागाला होती. सातत्याने ते त्याचा मागोवा घेत होते. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिध्द ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा गावाशेजारी असलेल्या जंगलात सोमवारी सकाळी त्याचा […]

ताडोबातील वयोवृद्ध वाघाचा मृत्यू

चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा मृत्यू झाला. वाघडोह वाघाचा सिनाळा नर्सरी जवळ नैसर्गिक मृत्यू झाला. काही महिन्यांपासून हा वाघ अशक्त असल्याची माहिती वनविभागाला होती. सातत्याने ते त्याचा मागोवा घेत होते. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिध्द ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा गावाशेजारी असलेल्या जंगलात सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. ‘ताडोबा’ला जागतिक कीर्ती मिळवून देण्यात वाघडोहचा मोठा वाटा होता. वाघडोहच्या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमी व्यथित झाले असून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. सोमवारी सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

हा वाघ अशक्त असल्याची माहिती वनविभागाला होती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते.
हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर वाघ होता.

वयस्कर असल्याने त्याला शिकार करणं अशक्य होते .तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडलं होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number