‘संतांच्या शिकवणीवर देश पुढे चालला आहे’

पुण्यातील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. तर पंतप्रधान मोदी यांनी भगवान विठ्ठल आणि वारकऱ्यांना वंदन केले. तसेच देहूच्या पवित्र भूमिवर येऊन शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणं हे भाग्य असल्याचे पंतप्रधान मोदी […]

‘संतांच्या शिकवणीवर देश पुढे चालला आहे’

पुण्यातील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. तर पंतप्रधान मोदी यांनी भगवान विठ्ठल आणि वारकऱ्यांना वंदन केले. तसेच देहूच्या पवित्र भूमिवर येऊन शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणं हे भाग्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच हे स्थळ तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कार्यभूमी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रंजल्या गंजल्याची सेवा करणे हीच संतांची शिकवण असून संतांच्या याच शिकवणीतून देश पुढे चाललाय, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.संतांच्या कार्यातून ऊर्जा मिळत असल्याचेही ते म्हणाले. जो भंग होत नाही तो अभंग असे म्हणत पंढरपूरची यात्रा म्हणजे ऊर्जास्त्रोत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तसेच संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच या कामासाठी ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार असून यासाठी ११ कोटींहून जास्त खर्च येणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. देहूतील शिळामंदीर भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. तसेच या स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number