महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. आजच्या काळात महिला फक्त घर सांभाळत नाहीत, तर स्वतःचे उद्योग उभारत आहेत आणि शासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करताना दिसत आहेत.
अनेक महिलांकडे उद्योग सुरू करण्यासाठी अद्भुत कल्पना असल्या तरी, आर्थिक अडचणींमुळे त्या पूर्ण होत नाहीत. अशाच महिलांसाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना राबवली आहे, ज्याद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य मिळते आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. ही योजना अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या राबवली जात आहे.
महिलांना स्वत:चा उद्योग उभागण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना सुरु केली आहे. ज्या महिलांना स्वत:चा उद्योग उभारायचा आहे अशा महिलांसाठी केंद्र सरकार ही योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी कर्ज दिले जाते. ज्यामुळे त्या त्यांचे उद्योग सुरु करु शकतात.
हेही वाचा- SIM Binding : सायबर फ्रॉड रोखण्यासाठी WhatsApp, Telegram बाबत सरकारचा मोठा निर्णय
सरकारकडून दिले जाणारे हे कर्ज एक ते तीन लाखापर्यंतचे असू शकते, त्याचसोबत हे कर्ज कोलॅटरल फ्री म्हणजेच लाभार्ती उद्योगिनींना कोणतेही तारण ठेवण्याची गरज नसते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचं वय साधारणत: 18 ते 55 वर्षे इतके असणे आवश्यक आहे. तर दिव्यांग महिलांना वयाची कोणतीही अट नाही. सर्वात अगोदर ही योजना कर्नाटक राज्यात सुरु करण्यात आली होती. आता या योजनेचा विस्तार केंद्र सरकारने देशभरात केला आहे.