ब्रिटनची राणी एलिझाबेथ २ यांचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात आता किंग चार्ल्स हे ब्रिटनचे सम्राट होणार आहेत. दरम्यान विशेष बाब म्हणजे ब्रिटनवासी तब्बल ७० वर्षांनी राज्याभिषेकाचे साक्षीदार होणार आहेत. तर ६ मे रोजी ब्रिटनमध्ये पार पडण्याऱ्या या सोहळ्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया :
गेल्या हजारो वर्षांपासून ब्रिटिनमध्ये देशाच्या सम्राटाचा राज्यभिषेक करण्याची परंपरा आहे. आज हजारो वर्षांनंतर पुन्हा एकदा हा विलक्षण सोहळा ब्रिटन मध्ये पार पडणार आहे. राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतरच प्रिन्स चार्ल्सला सम्राटाचा दर्जा मिळाला. मात्र आता त्यांचा विधीवत राज्याभिषेक सोहळा ६ मे रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हा भव्य सोहळा तीन दिवस चालणार असून या सोहळ्यासाठी २२०० हून अधिक शाही पाहुणे, राजघराण्यातील सदस्य तसेच भूतान, थायलंड, जपानसह एकूण १०० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात चार्ल्स सह त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचा देखील राज्याभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर किंग चार्ल्स यांना ब्रिटनच्या धार्मिक आणि नैतिक अधिकारांचे प्रतीक असलेला शाही ओर्ब आणि राजदंड दिला जाईल.
यातही खास गोष्ट म्हणजे ब्रिटिश राजेशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध, हिंदू, ज्यू, मुस्लिम आणि शीख धर्मगुरूही राज्याभिषेकाच्या विधीत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी भारतातून उपराष्ट्रपती जगदीप धनकड, त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहे तर खास मुंबईच्या २ डब्बेवाल्यांना देखील या सोहळ्याचे आमंत्रण आले आहे. त्यामुळे ब्रिटन सह भारतात देखील या सोहळ्याची उत्सुकता आहे.