Thar, Fortuner Owners Oath: ‘रस्त्यावर भाईगिरी नको!’; थार अन् फॉर्च्युनर मालकांना दिली शपथ; प्रशासनाचा अनोखा उपक्रम

जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनांच्या मालकांना गाड्यांसमोर उभे करून सुरक्षेची शपथ देण्यात आली.

Thar, Fortuner Owners Oath: ‘रस्त्यावर भाईगिरी नको!’; थार अन् फॉर्च्युनर मालकांना दिली शपथ; प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Thar-Fortuner Owners Oath Viral Video: देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेकदा वाहनांचा रुबाब दाखवण्यासाठी होणारे बेदरकार ड्रायव्हिंग याला कारणीभूत ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर दमण जिल्हा प्रशासन आणि आरटीओ (RTO) विभागाने संयुक्तपणे ‘रफ्तार नहीं, संस्कार’ हे रस्ते सुरक्षा अभियान राबवले आहे. या अभियानांतर्गत महिंद्रा थार (Thar) आणि टोयोटा फॉर्च्युनर (Fortuner) सारख्या मोठ्या एसयूव्ही (SUV) वाहनांच्या मालकांना एकत्र आणून रस्त्यांवर भाईगिरी किंवा हिरोगिरी न करण्याचे आवाहन करण्यात आले.

मैदानावर गाड्यांची रांग; उपस्थितांना दिली रस्ते सुरक्षेची शपथ
बुधवारी, 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयोजित ‘संकल्प यात्रा’ कार्यक्रमात शेकडो थार आणि फॉर्च्युनर गाड्या एका मैदानावर रांगेत उभ्या करण्यात आल्या होत्या. दमणचे जिल्हाधिकारी सौरभ मिश्रा, पोलीस अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाहनांच्या मालकांना गाड्यांसमोर उभे करून सुरक्षेची शपथ देण्यात आली. ‘मी अतिवेगाने किंवा निष्काळजीपणे गाडी चालवणार नाही, रस्त्यावर स्टंट, रेसिंग किंवा ड्रिफ्टिंग करणार नाही, मद्यपान करून वाहन चालवणार नाही आणि वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणार नाही,’ अशी शपथ सर्वांनी घेतली.

‘थारची ओळख भाईगिरीसाठी नाही’; आनंद महिंद्रांना टॅग करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी सौरभ मिश्रा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, ‘थार किंवा फॉर्च्युनर ही गाड्यांची ताकद गुंडगिरी किंवा भाईगिरी दाखवण्यासाठी नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे.’ त्यांनी वाहनचालकांना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच, या मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओ महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना सोशल मीडियावर टॅग करण्याचे सुचवले, जेणेकरून कंपनी स्वतः देशभरात अशा प्रकारची सुरक्षा मोहीम राबवण्यासाठी प्रेरित होईल.

हेही वाचा – Nashik Crime: नाशिकमध्ये सरकारी डॉक्टरचा धक्कादायक कारनामा; भरधाव कारने 3 पादचाऱ्यांना उडवलं, संतप्त नागरिकांचा उद्रेक

वाहनातील अनधिकृत बदल हटवण्याचे निर्देश; कायदेशीर कारवाईचा इशारा
दमण आरटीओकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व थार आणि फॉर्च्युनर गाड्यांना या संकल्प यात्रेसाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान वाहनांमध्ये केलेले अनधिकृत फेरफार, जसे की अवाजवी मोठे टायर्स किंवा मॉडिफाईड साऊंड सिस्टिम, तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्यावर स्टंट किंवा नियमभंग करणाऱ्या चालकांवर प्रशासनाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.

सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या माहिती व प्रसिद्धी विभागातर्फे या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हातात रस्ते सुरक्षेचे फलक घेऊन मैदानाभोवती फेरी मारणारे थार व फॉर्च्युनर मालक नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रशासनाच्या या ‘रफ्तार नहीं, संस्कार’ मोहिमेचे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पक उपक्रमाचे देशभरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा – konkan Railway : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी एक्स्प्रेस! कसे असतील थांबे अन् वेळ?, वाचा सविस्तर वेळापत्रक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number