लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं ज्यावरून पुढे आरोप – प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. पण २९ डिसेंबर, २०२२ रोजी सामाना मुखपत्राच्या मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही आवृत्तीत ‘राहुल शेवाळेंचा कराचीत रिअल इस्टेट आणि हॉटेल्सचा व्यवसाय’, अशी बातमी छापण्यात आली होती. यावर कायदेशीर पाऊल उचलत […]
लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं ज्यावरून पुढे आरोप – प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. पण २९ डिसेंबर, २०२२ रोजी सामाना मुखपत्राच्या मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही आवृत्तीत ‘राहुल शेवाळेंचा कराचीत रिअल इस्टेट आणि हॉटेल्सचा व्यवसाय’, अशी बातमी छापण्यात आली होती. यावर कायदेशीर पाऊल उचलत राहुल शेवाळे यांनी सामनाचे संपादक – उद्धव ठाकरे आणि उपसंपादक – संजय राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. तसेच, सामनामध्ये त्यांच्याविषयी छापलेल्या सर्व बातम्या खोट्या असल्याचेही म्हटले आहे.