जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या ९व्या बटालियनवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ३ जवान हुतात्मा झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
श्रीनगरमध्ये घडलेल्य दहशतवादी हल्ल्यात किती दहशतवादी होते आणि जवानांवर कशाप्रकारे हल्ला करण्यात आला, याबाबत तपास सुरू असून या घटनेतील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरातील भागात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी या परिसरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहित सुरू केली. आणि दरम्यान या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल आहेत.