भीषण अपघात, ९ जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रायगडजवळील रेपोली गावाजवळ झाला असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. रायगडमधील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ […]

भीषण अपघात, ९ जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रायगडजवळील रेपोली गावाजवळ झाला असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

रायगडमधील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. तर अपघातात एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. कारमधील प्रवासी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी येथे चालले होते. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number