एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बस्तान ठोकले आहे. जोवर विलिनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोवर कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलक एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले आहे.
‘आमची एक मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही. गेले १३ दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जो पर्यंत आमची विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही येथून जाणार नाही,’ अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस आहे. तरीही महाविकास आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले आहे.