सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची थेट राखी सावंतशी तुलना केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वार-पलटवार रंगणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्याच बनल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर त्या कडाडून टीका करतात. यामुळे माध्यमांतूनही त्या वारंवार झळकतात. यावरूनच मोहित कंबोज यांनी ही टीका केली आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा रंगते, अशी टीका करत त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.
पाहुयात मोहित कंबोज यांचं ट्विट
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा सनसनी कौन मचाई गा !
ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महाविकास आघाडीतर्फे काल भव्य मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आधीही देवेंद्र फडणवीसांना फडतूस असे संबोधून राजकारण तापवलंय. त्यातच कालच्या मोर्चात सुषमा अंधारे यांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या याही भाषणाची ठाण्यात चर्चा आहे. त्यामध्ये आता मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे चांगलंच राजकारण तापणार आहे.