परमबीर सिंग यांच्या अटकेच्या सुरक्षेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या अटकेच्या सुरक्षेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वकिलांनी अटकेच्या सुरक्षेची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून परमबीर सिंग यांना दिलासा […]

परमबीर सिंग यांच्या अटकेच्या सुरक्षेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या अटकेच्या सुरक्षेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

 माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वकिलांनी अटकेच्या सुरक्षेची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच परमबीर सिंग कुठे आहेत, त्यांचा पत्ता कळवा असे आदेशही न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या वकिलांना दिले आहेत.

  परमबीर सिंग यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या वकिलांना खडेबोल सुनावले आहे. परमबीर सिंग कुठे आहेत, ते देशात आहेत की देशाबाहेर गेले आहेत, त्यांचा आधी पत्ता आम्हाला कळवा, असे न्यायमूर्ती म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number