कोल्हापुरात एका डॉक्टर तरुणीची आत्महत्या

कोल्हापुरात एका डॉक्टर असलेल्या तरुणीने हातात इंजेक्शनद्वारे द्रव्य टोचून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे वय वर्ष ३०असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांच्या त्या कन्या आहेत. मध्यरात्रीपासून त्या बेपत्या होत्या. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात त्यांचा मृतदेह आढळला.रविवारी पहाटेच्या […]

कोल्हापुरात एका डॉक्टर तरुणीची आत्महत्या

कोल्हापुरात एका डॉक्टर असलेल्या तरुणीने हातात इंजेक्शनद्वारे द्रव्य टोचून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे वय वर्ष ३०असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे यांच्या त्या कन्या आहेत. मध्यरात्रीपासून त्या बेपत्या होत्या. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात त्यांचा मृतदेह आढळला.रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराजवळील डी मार्ट परिसरात त्यांचा मृतदेह रस्त्याकडेला फूटपाथवर आढळला. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी मृतदेहाच्या हातात इंजेक्शन अडकलेल्या अवस्थेत होते. तसेच त्यांच्या पर्समध्ये दोन इंजेक्शन आणि एक औषधांची बाटलीही मिळाली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.आत्महत्येचे कारण समजलेले नाही. तपास सुरूआहे

अपूर्वा या गेले काही महिने अस्वस्थ होत्या. त्यांनी यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा त्या घरात पोहोचल्या, त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास त्या पुन्हा घराबाहेर पडल्या. बाहेरून कडी लावून त्या बाहेर पडल्यामुळे तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली . बराच वेळ शोधूनही त्या सापडल्या नाहीत. तेव्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.तेव्हा कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात त्यांचा मृतदेह आढळला.रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराजवळील डी मार्ट परिसरात त्यांचा मृतदेह रस्त्याकडेला फूटपाथवर आढळला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number