रोमानियाच्या भारतीय दूतावासावर विद्यार्थ्यांचा आरोप

रशिया-युक्रेन युद्धात अनेक भारती विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले. मात्र, युक्रेनमधून परतलेल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भारतात परतण्यासाठी दूतावासातील शौचालय स्वच्छ करण्याची जबरदस्ती करण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी रोमानियातील भारतीय दूतावासावर केला आहे. जे विद्यार्थी शौचालय स्वच्छ करतील, त्यांनाच सर्वात आधी भारतात पाठवले […]

रोमानियाच्या भारतीय दूतावासावर विद्यार्थ्यांचा आरोप

रशिया-युक्रेन युद्धात अनेक भारती विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले. मात्र, युक्रेनमधून परतलेल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

भारतात परतण्यासाठी दूतावासातील शौचालय स्वच्छ करण्याची जबरदस्ती करण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी रोमानियातील भारतीय दूतावासावर केला आहे. जे विद्यार्थी शौचालय स्वच्छ करतील, त्यांनाच सर्वात आधी भारतात पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी बजावल्याचे विदयार्थ्यांनी सांगितले. तसेच रोमानियातील नागरिकांनी आम्हाला मदत केली तर राहण्यासाठी जागा दिली, जेवण दिले असल्याची माहिती रोमानियाहून परतलेल्या बिहारमधील प्रतिभाने दिली आहे.

मराठवाड्यातील ३३ विद्यार्थी युक्रेनमध्येच

मराठवाड्यातून युक्रेनला शिक्षणासाठी ११५ विद्यार्थी गेले होते त्यापैकी ८२ विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले आहेत. तर अद्याप मराठवाड्यातील ३३ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक १४ विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number