कोल्हापूर पोटनिवडणूकीसाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, भाजप नेते चित्रा वाघ भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाली असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. कोल्हापुरमधील मुक्त सैनिक वसाहत येथील सभेत हा प्रकार घडला आहे.
कोल्हापूर सभेत दगडफेक झाल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ‘वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असताना तिथे दगडं मारण्यात आली. तुमची दहशत गंड बलात्कारापर्यंत दाखवा, असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षात ठेवा.’
वाह रे बहाद्दरांनो… समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां… आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार @SatyajitKspeaks प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली… तुमची दहशत गुंड बलात्कार्यांवर दाखवा…असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 3, 2022
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ कोल्हापुरात आल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या सभेत दगडफेक झाली असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. तर चित्रा वाघ यांच्या आरोपांना गृह राज्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्याचा आरोप गृह राज्यमंत्री बंटी सतेज यांनी केला आहे.