आपण कसे दिसतो? किंवा आपली त्वचा कशी आहे,याकडे सगळ्यांचे लक्ष असते. विशेषतः स्त्रियांचे आपले आपल्या त्वचेकडे खास लक्ष असते. त्या साठी बऱ्याचवेळा आपण महागडे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु काही वेळेला या प्रॉडक्ट्समुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेतली तरच आपली त्वचा तजेलदार राहील.
त्वचेची काळजी घेण्याचे काही नियम पुढीलप्रमाणे :
सर्वात आधी त्वचेला नीट स्वच्छ करणे हे खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे दिवसातून कमीतकमी दोनवेळा आपली त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्वचेवर दिवसातून दोन वेळा मॉइश्चरायझर लावा.
कडक उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करेल. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपली त्वचा देखील तजेलदार राहील. त्यामुळे दररोज ८-१० ग्लास पाणी प्यावे.
आपल्या त्वचेसाठी योग्य उत्पादनांची निवड करावी. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा.
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी संतुलित आणि योग्य आहार खूप महत्वाचा आहे.त्यामुळे आपल्या आहारात नेहमी प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि जास्त पाणी यांचा समावेश असावा.
जास्त मानसिक तणावामुळे त्वचेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन आणि इतर मेडिटेशन तंत्रांचा अवलंब करावा.