Weekly Horoscope : या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. पण नफ्यासोबतच, तुमचे मन विविध प्रकारच्या गुंतवणुकींमध्येही गुंतू शकते. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेण्याचा आणि सध्या भागीदारी व्यवसाय व चलाख आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. चंद्र राशीनुसार शनी अकराव्या घरात असल्यामुळे, तुम्हाला जाणवेल की तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पैलूचा आनंद घेऊ शकता. या काळात, तुमच्यापैकी बहुतेक जण हेच सूत्र पाळतील आणि आपल्या वाईट सवयी सुधारण्याचा प्रयत्न करतील. जाणून घ्या 28 जून ते 4 जुलै 2026 हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असेल.
मेष : धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. खरेदीसाठीही काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल.
वृषभ : मंगळ, हर्षल, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन इ. गोष्टींशी आहे त्यांना ग्रहमान उत्तम आहे.
मिथुन : सूर्य, धनस्थानी बुध, गुरु, शुक्र, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. आहारावर नियंत्रण ठेवा. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर आनंदात जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
कर्क : बुध, गुरु, शुक्र, धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात मंगळ, हर्षल, आणि व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना हा काळ अनुकूल आहे. प्रलंबीत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या.
सिंह : केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात मंगळ, हर्षल, लाभस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. परदेशासंबंधी असलेल्या कामांमध्ये यश मिळेल. संततीसाठी काही खरेदी कराल. नवीन काही शिकायचं असेल तर त्यासाठी ग्रहस्थिती चांगली आहे.
कन्या : शनि, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. शेयर किंवा अन्य जोखीम असलेले व्यवहार शक्यतो टाळा. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य. त्यानंतरचे दोन दिवस कौटुंबीक सौख्याचे आहेत. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या/ मित्रमैत्रिणींच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे.
तुळ : चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवास लाभदायक ठरतील.
वृश्चिक : चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. नंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
धनु : धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान जोखीम असलेली कामे करु नका. आणि वाहने सावकाश चालवा. मधूमेह असेल तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. सप्ताह मध्यात व नंतर भाग्यवर्धक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल.
मकर : धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात बुध, गुरु, शुक्र आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा. तब्येतीची काळजी घ्या.
कुंभ : धनस्थानात शनि, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी बुध, गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
मीन : शनि, नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)