Space Sunset: अंतराळातून असा दिसतो पृथ्वीचा सूर्यास्त; ‘हा’ नजारा यापूर्वी कधीच पाहिला नसेल, थक्क करणारा 360-डिग्री VIDEO

सात मोठ्या काचेच्या खिडक्यांनी सज्ज असलेल्या या मॉड्यूलमधून पृथ्वी आणि अवकाशाचे विस्तृत दृश्य पाहता येते. याच वैशिष्ट्यामुळे 'कपोला'ला अंतराळ स्थानकाची 'विंडो टू अर्थ' म्हणून ओळखले जाते.

Space Sunset: अंतराळातून असा दिसतो पृथ्वीचा सूर्यास्त; ‘हा’ नजारा यापूर्वी कधीच पाहिला नसेल, थक्क करणारा 360-डिग्री VIDEO

भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीचे अप्रतिम दृश्य दाखवणारा 360 अंशांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केला आहे. पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवरून चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीचे सौंदर्य आणि अंतराळ स्थानकातील जीवनाची दुर्मीळ झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ ISS वरील ‘कपोला’ (Cupola) या निरीक्षण मॉड्यूलमधून चित्रित करण्यात आला आहे. सात मोठ्या काचेच्या खिडक्यांनी सज्ज असलेल्या या मॉड्यूलमधून पृथ्वी आणि अवकाशाचे विस्तृत दृश्य पाहता येते. याच वैशिष्ट्यामुळे ‘कपोला’ला अंतराळ स्थानकाची ‘विंडो टू अर्थ’ म्हणून ओळखले जाते.

व्हिडिओमध्ये अनिल मेनन यांनी कपोलाच्या आतील भागाची माहिती देतानाच सहकारी अंतराळवीर ख्रिस्तोफर विल्यम्स यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची झलकही दाखवली आहे. दोघांनी अंतराळ मोहिमांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली असून कॅमेरे, स्पेसवॉक, तारे आणि वैज्ञानिक निरीक्षणांबाबतचे अनुभवही शेअर केले. व्हिडिओतील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे कपोलाच्या खिडकीतून दिसणारा पृथ्वीवरील सूर्यास्त. अंतराळातून दिसणारे बदलते रंग, पृथ्वीभोवतीचे वातावरण आणि अवकाशातील काळोख यांचा संगम या दृश्याला अधिक आकर्षक बनवतो.

2010 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडण्यात आलेले ‘कपोला’ हे केवळ पृथ्वीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठीच नाही, तर अनेक महत्त्वाच्या कामांसाठीही वापरले जाते. नवीन अंतराळयान स्थानकाला जोडले जात असताना त्यावर लक्ष ठेवणे, रोबोटिक आर्मचे संचालन करणे तसेच पृथ्वीवरील चक्रीवादळे, जंगलातील आगी आणि इतर नैसर्गिक घटनांचे निरीक्षण व छायाचित्रण करण्यासाठी या मॉड्यूलचा उपयोग केला जातो.

अनिल मेनन यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अंतराळातून पृथ्वीचे असे विहंगम दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विज्ञान आणि अंतराळ संशोधनात रस असलेल्या नागरिकांसाठी हा व्हिडिओ विशेष आकर्षणाचा ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number