Central Railway Recruitment: परीक्षा नाही, मुलाखतही नाही! रेल्वेमध्ये थेट नोकरीची संधी; त्वरित असा करा अर्ज

निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटवर आधारित असून उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.

Central Railway Recruitment: परीक्षा नाही, मुलाखतही नाही! रेल्वेमध्ये थेट नोकरीची संधी; त्वरित असा करा अर्ज

नवी दिल्ली: रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2801 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. देशभरातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.scr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करावा.

या भरतीमध्ये विविध तांत्रिक ट्रेडमधील अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, एसी मेकॅनिक यांसारख्या अनेक ट्रेडचा समावेश आहे. या पदांपैकी सर्वाधिक पदे इलेक्ट्रिशियन आणि फिटर या ट्रेडसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. ज्यांनी तांत्रिक ट्रेडमध्ये ITI पूर्ण केले आहे, ते उमेदवार या भरतीसाठी सहज अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयाची गणना 23 मार्च 2026 या तारखेच्या आधारावर केली जाणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. त्यानुसार OBC उमेदवारांना तीन वर्षे, तर SC/ST उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.

हेही वाचा: Shivalik LPG Tanker: अखेर 'शिवालिक' LPG टँकर आज हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणार, मुंद्रा बंदरावर होणार दाखल

अर्ज शुल्काबाबतही वेगवेगळे नियम ठेवण्यात आले आहेत. सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. अर्ज शुल्काचे भुगतान डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन करता येईल.

या भरतीमध्ये उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. मेरिट यादी दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारे तयार करण्यात येईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणी (Document Verification) करण्यात येईल.

निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस प्रशिक्षणादरम्यान दरमहा सुमारे 10,500 ते 15,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. हा प्रशिक्षण कालावधी उमेदवारांना तांत्रिक अनुभव देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, ज्यामुळे पुढे रेल्वे किंवा इतर क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्यास मदत होऊ शकते.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतर अर्ज लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. पुढे अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. योग्य माहिती भरून वेळेत अर्ज केल्यास उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा: Bad Cholesterol Control: सायलेंट किलर ठरू शकतं 'बॅड कोलेस्ट्रॉल'; आजच आहारात करा 'या' भाजीचा समावेश, राहाल एकदम फिट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number