Sonam Wangchuk Health Update: प्रदीर्घ काळाच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी? डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता, कारण…

रुग्णालयाने रविवारी सकाळी त्यांच्याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर केला.

Sonam Wangchuk Health Update: प्रदीर्घ काळाच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी? डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता, कारण…

दिल्लीत विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी शनिवारी त्यांना ताब्यात घेत थेट सफदरजंग रुग्णालयात हलवले. दरम्यान, रुग्णालयाने रविवारी सकाळी त्यांच्याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर केला.

 प्रदीर्घ उपोषणाचा शरीरावर परिणाम

सफदरजंग रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरावर ताण निर्माण झाला आहे. त्यांच्या रक्तातील काही महत्त्वाच्या रक्त तपासणीत काही महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत.. मात्र, इतर जीवनावश्यक शारीरिक मापदंड सध्या नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

 तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

उपोषणामुळे उद्भवू शकणाऱ्या गुंतागुंती लक्षात घेऊन वांगचुक यांच्यावर व्हीएमएमसी (VMMC) आणि सफदरजंग रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. विविध शाखांतील डॉक्टरांचे संयुक्त पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रत्येक बाबीचे बारकाईने निरीक्षण केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

 एम्सच्या डॉक्टरांचाही सहभाग

वांगचुक यांच्या उपचार प्रक्रियेत एम्स, नवी दिल्ली येथील वरिष्ठ डॉक्टरांचाही सहभाग आहे. सफदरजंग आणि एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला असून, आवश्यक त्या उपचारांबाबत मार्गदर्शन केले आहे.

24 तास वैद्यकीय निरीक्षण

डॉक्टरांच्या मते, सध्या वांगचुक यांची प्रकृती स्थिर असली तरी प्रदीर्घ उपोषणामुळे अचानक वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना २४ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताच्या तपासण्या नियमितपणे करण्यात येत असून, प्रकृतीनुसार आवश्यक उपचार सुरू असल्याचे मेडिकल बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number