CJP Protest: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवलं; प्रकृती स्थिर असतानाही प्रशासनाची कारवाई, डॉक्टरांचा मोठा दावा

सोनम वांगचुक यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असतानाही केवळ राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या डॉक्टरांनी केला आहे.<br/>

CJP Protest: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवलं; प्रकृती स्थिर असतानाही प्रशासनाची कारवाई, डॉक्टरांचा मोठा दावा

CJP Protest: लडाखला विशेष दर्जा मिळण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रशासनाने आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवून रुग्णालयात दाखल केले आहे. या कारवाईवरून आता मोठे वादळ निर्माण झाले असून, वांगचुक यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असतानाही केवळ राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या डॉक्टरांनी केला आहे.

प्रकृती स्थिर असतानाही कारवाई का? – डॉक्टरांचा सवाल
सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेणारे त्यांचे डॉक्टर नितीन यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना प्रशासकीय कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉ. नितीन म्हणाले, “गेल्या 20 दिवसांपासून मी आणि माझी पूर्ण टीम सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. काल संध्याकाळपर्यंत त्यांचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची कोणतीही वैद्यकीय गरज नव्हती. आज सकाळी स्वतः वांगचुक यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचे आणि उपोषण पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना आंदोलनस्थळावरून नेण्यात आले.”

20 जुलैच्या आंदोलनाला घाबरून पाऊल?
डॉक्टरांनी पुढे बोलताना संशय व्यक्त केला की, आगामी 20 जुलै रोजी होणाऱ्या मोठ्या आंदोलनाला घाबरूनच प्रशासनाने ही घाईघाईने कारवाई केली असावी. कोणत्याही ठोस वैद्यकीय कारणाशिवाय केवळ भीतीपोटी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे, असे डॉक्टर म्हणाले.

हेही वाचा – Abhijit Dipke: सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दिपके आक्रमक; जंतर-मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा

मानवाधिकार आणि वैद्यकीय नियमांचे उल्लंघन?
आंदोलनस्थळावरून वांगचुक यांना फरपटत नेण्यात आल्याच्या आरोपांवर बोलताना डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “वैद्यकीय नियमांनुसार, जो व्यक्ती आंदोलन किंवा उपोषणाला बसला आहे, त्याच्या इच्छेनुसार आणि सहमतीनेच त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा अधिकार असतो. परंतु, वांगचुक यांच्या बाबतीत त्यांच्या मनाचा किंवा आरोग्याचा कोणताही विचार न करता, कोणतीही कल्पना न देता ही कारवाई करण्यात आली, जी पूर्णपणे चुकीची आहे,” असे डॉ. नितीन यांनी स्पष्ट केले.

सध्या सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या समर्थकांकडून आणि सहकाऱ्यांकडून या बळजबरीच्या कारवाईचा तीव्र निषेध केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number