Sonam Wangchuk: ‘…कोणतेही औषध किंवा उपचार देऊ नयेत’; सोनम वांगचुक यांच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या?

उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Sonam Wangchuk: ‘…कोणतेही औषध किंवा उपचार देऊ नयेत’; सोनम वांगचुक यांच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच पत्नी गीतांजली जे अंग्मो यांनी रुग्णालय प्रशासनाला महत्त्वाची सूचना दिली आहे. गीतांजली जे अंग्मो यांनी सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत पोस्टमधून स्पष्ट केले की, त्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांच्यावर कोणतेही औषधोपचार करण्यात येऊ नयेत. त्यांनी विशेषतः तोंडावाटे दिली जाणारी औषधे तसेच शिरेद्वारे (Intravenous) दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्या सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपस्थित असून गेल्या २० दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करू नये. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने आवश्यक काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. सोनम वांगचुक गेल्या अनेक दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून समर्थकही सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number