‘विरोधकांपैकी काही नेते शिंदेंसोबत’

komal mane पावसाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी विरोधक शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. आजही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत गद्दार म्हणून घोषणा दिल्या. यावर उदय सामंत यांनी केवळ विरोधक म्हणून विरोध करत आहेत. या विरोधकांपैकीच काही लोक मुख्यमंत्री शिंदेंसोबत असल्याचे मोठे विधान केले आहे. सलग दोन दिवस विधीमंडळाच्या बाहेर विरोधक आंदोलन करत असून गद्दार […]

‘विरोधकांपैकी काही नेते शिंदेंसोबत’

komal mane

पावसाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी विरोधक शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. आजही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत गद्दार म्हणून घोषणा दिल्या. यावर उदय सामंत यांनी केवळ विरोधक म्हणून विरोध करत आहेत. या विरोधकांपैकीच काही लोक मुख्यमंत्री शिंदेंसोबत असल्याचे मोठे विधान केले आहे.

सलग दोन दिवस विधीमंडळाच्या बाहेर विरोधक आंदोलन करत असून गद्दार अशा घोषणा देत आहेत. उदय सामंत म्हणाले, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण शिवसेना आणि भाजप एकत्र लढली मतदारांनी संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. महाविकास आघाडी ही एक अनैसर्गिक युती होती, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, असेही सामंत यांनी नमूद केले.

केवळ विरोधक म्हणून जर विरोध करत आहेत. त्यामुळे त्याला महत्व नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांपैकी काही लोक मुख्यमंत्री शिंदेंसोबत असल्याचे मोठे विधान केले आहे. विरोधकांपैकी शिंदेंसोबत असलेले लोक लवकरच कळतील, असेही सामंतांनी यावेळी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ते विरोधक कोणते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटात आता शिवसेनेसह आता आणखी कोणत्या पक्षातून इनकमिंग होणार. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number