Snapchat New Rule: स्नॅपचॅटने काढला नवीन नियम, आता स्टोरेजसाठी मोजावे लागणार पैसे

स्नॅपचॅट या अॅपने सगळ्यांना वेड लागले आहे. बरेचजण फोटो काढण्यासाठी त्याचा वापर करतात. स्नॅपचॅटने आता त्याच्या मेमरीज सुविधेला पेड केले आहे.

Snapchat New Rule: स्नॅपचॅटने काढला नवीन नियम, आता स्टोरेजसाठी मोजावे लागणार पैसे

मुंबई: स्नॅपचॅट या अॅपने सगळ्यांना वेड लागले आहे. बरेचजण फोटो काढण्यासाठी त्याचा वापर करतात. स्नॅपचॅटने आता त्याच्या मेमरीज सुविधेला पेड केले आहे. म्हणजेच आता जास्त फोटो काढण्यासाठी पैसै मोजावे लागणार आहेत. युजर्सना केवळ 5GB पर्यंतचा फ्री स्टोरेज मिळणार आहे. त्याहून जास्त डेटा सेव्ह करण्यासाठी आता युजरना पेड प्लान विकत घ्यावा लागणार आहे. कंपनीने 100GB, 256GB आणि 5TB चे नवे स्टोअरेज प्लान सादर केले आहेत. 

लोकप्रिय चॅटींग ऐप Snapchat ने त्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत युजर्स त्याचे फोटो आणि व्हिडीओना Memories टॅबमध्ये अनलिमिटेड फ्री स्टोरेजसह सेव्ह करु शकत होते. परंतू आता मात्र त्यांना असे करता येणार नाहीय कंपनीने घोषणा केली आहे की आता येथून पुढे Snapchat वर केवळ 5GB पर्यंतच फ्री स्टोरेज मिळेल. याहून अधिक डेटा सेव्ह करण्यासाठी युजर्सना आता पेड स्टोरेज प्लान घ्यावा लागणार आहे.Google Drive वा iCloud ला ज्याप्रमाणे पेड स्टोरेज प्लान घ्यावा लागतो तसेच करावे लागणार आहे.

हेही वाचा: FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा! आता दुप्पट नाही, फक्त एवढाच टोल भरा..

नवीन स्टोरेज प्लानची सिस्टीम काय? 
ज्या युजर्सची मेमरीज 5GB हून अधिक आहे. त्यांना आता जास्त स्टोरेजसाठी पैसे भरावे लागतील. म्हणजे जर तुम्ही वर्षानुवर्षे आपले फोटो आणि व्हिडीओ मेमरीत सेव्ह करत असाल तर आता यापुढे त्यांना सेव्ह करण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. कंपनीने यासाठी तीन नवीन मेमरी स्टोरेज प्लॅन (Memory Storage Plans) सादर केले आहेत. जे खालील प्रमाणे आहेत.

आधीचा स्टोरेज आणि डेटा डिलीट होण्याचा धोका
स्नॅपचॅटने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की ज्या वापरकर्त्यांचा डेटा 5GB हून अधिक आहे, त्यांना 12 महिन्यांचा टेंपररी स्टोरेज दिला जाईल. जर या दरम्यान त्यांना कोणताही पेड प्लान घ्यायचा नसेल तर त्यांची जुनी मेमरी डिलिट होऊ शकते. यामुळे वापरकर्त्यांची चिंता वाढणार आहे. कंपनीने युजर्सना सल्ला दिला आहे की आपले जुने फोटो आणि व्हिडीओ हवे तर डाऊनलोड करुन आपल्या फोनमध्ये सेव्ह करु शकता.

कंपनीने म्हटले की फ्रीवरुन पेड सर्व्हीसमध्ये बदलणे सोपे नाही. परंतु मेमरी फिचरच्या व्हॅल्यूसाठी योग्य असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात युजर्सना आणखी चांगला स्टोरेज आणि डेटा सुरक्षा देऊ शकेल. यासाठी हा बदल गरजेचा असल्याचे स्नॅपचॅटचे म्हणणे आहे. स्नॅपचॅटच्या या निर्णयामुळे हा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही वर्षांपासून वापरकर्त्यांनी त्यांच्या आठवणींचे क्षण या अॅपमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. मात्र आता यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच लोकांना आता जुना डेटा डाऊनलोड करणेही कठीण होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number