S.Jaishankar : ‘इराणच्या एका जहाजाला दिला होता आश्रय पण…’, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत केला मोठा खुलासा

एस. जयशंकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीयांना आर्मेनियामार्गे बाहेर काढले जात आहे.

S.Jaishankar : ‘इराणच्या एका जहाजाला दिला होता आश्रय पण…’, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत केला मोठा खुलासा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाबद्दल राज्यसभेत चिंता व्यक्त केली. जयशंकर यांनी सांगितले की, भारताने हिंदी महासागरात अडकलेल्या इराणी जहाजालाही आश्रय दिला होता. एस. जयशंकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीयांना आर्मेनियामार्गे बाहेर काढले जात आहे.

परराष्ट्रमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले की, "आखातीत अडकलेल्या भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. मी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी बोललो. इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की त्यांची तीन जहाजे हिंद महासागरात आहेत. इराणच्या विनंतीवरून आम्ही एका जहाजाला आश्रय दिला. इराणने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे."

हेही वाचा – Pune Gas Cylinder News : पुन्हा वाढला नोंदणीचा कालावधी! तसेच पुण्यातील 'या' लोकांना मिळणार नाही गॅस सिंलिंडर, प्रशासनाचा मोठा निर्णय 

परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले, "ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सतर्क आहोत. परराष्ट्र मंत्री असेही म्हणाले की भारत शांततेला पाठिंबा देतो. आम्ही नागरिकांच्या सुरक्षेच्या बाजूने आहोत. आखाती प्रदेशात दहा कोटी भारतीय राहतात आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सीसीएस बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा – Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात 

जानेवारीमध्ये नागरिकांना इशारा दिला होता 
युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करताना परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, "आम्ही जानेवारीमध्ये आमच्या नागरिकांना इशारा दिला होता आणि त्यांना लवकरात लवकर घरी परतण्यास सांगितले होते. आमच्या दूतावासानेही एक सूचना जारी केली होती."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number