‘सिल्वर ओक प्रकरण हे भाजपाचे षडयंत्र’ – सतेज पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला, हे प्रकरण भाजपाचेच षडयंत्र असल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. तसेच या मागचा मास्टरमाईंड लवकरच पकडू, असा दावा करत पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट-निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी संपला असून आजपासून मतदानाला […]

‘सिल्वर ओक प्रकरण हे भाजपाचे षडयंत्र’ – सतेज पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला, हे प्रकरण भाजपाचेच षडयंत्र असल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. तसेच या मागचा मास्टरमाईंड लवकरच पकडू, असा दावा करत पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट-निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी संपला असून आजपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीत आमचाच विजय होणार, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर पोट निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला. जयश्री जाधव यांनी आयर्विन ख्रिश्चन हायस्कुलमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा मतदान केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number