Mrunal Reaction On Dating Rumors : "ते बोलतात, आम्ही…" श्रेयस अय्यर की धनुष? डेटींगच्या अफवांवर मृणालच्या प्रतिक्रियेने चाहत्यांना बसला मोठा धक्का

दक्षिणात्य तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली प्रभावशाली छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Mrunal Reaction On Dating Rumors : &quotते बोलतात, आम्ही…&quot श्रेयस अय्यर की धनुष? डेटींगच्या अफवांवर मृणालच्या प्रतिक्रियेने चाहत्यांना बसला मोठा धक्का

बॉलिवूड असो किंवा मराठी कलाकार, सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्रींच्या डेटिंगच्या अफवा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरतात. अनेक सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटूंच्या डेटींगच्या अफवा कानावर पडल्या आहेत. मात्र यावेळी एका अभिनेत्रीच नाव दोन व्यक्तींसोबत जोडलं जात आहे. दक्षिणात्य तसेच बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली प्रभावशाली छाप सोडणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

हेही वाचा- Samantha Ruth Prabhu wedding : लाल साडी, केसात गजरा! अन् समांथाचा दणक्यात पार पडला विवाह; पाहा 'हे' खास क्षण

यापुर्वी ती बिपाशावरुन केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच ट्रोल झाली होती. मात्र आता ती तिच्या लव्हलाईफला धरुन चर्चेत आली आहे. यावेळी मृणाल ठाकूर अभिनेता धनुषला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर ती एका रेडिट पोस्टने एक नवीन अफवा पसरवली, ज्यात असं म्हटलं होत की, मृणाल गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला डेट करत आहे आणि ते दोघेही त्यांचे नाते कमी दर्जाचे ठेवू इच्छितात. या दोन अफवांमुळे अनेकांना धक्का बसला. या सर्व गोंधळात, मृणालने आता या अफवांना विनोदी पद्धतीने उत्तर दित नेटकऱ्यांची तोंड बंद केली आहेत. 

मृणालने केलेली पोस्ट काय?
रविवारी मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ स्टोरीला शेअर करत सर्व अफवांवर पुर्णविराम लावला आहे. यावेळी मृणाल तिच्या आईसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तिची आई तिच्या केसांची तेलाने मालिश करत असताना मृणालने हा व्हिडिओ काढला आहे. तर तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं होत की, "ते बोलतात, आम्ही हसतो. ता. अफवा म्हणजे मोफत पीआर, आणि मला मोफत गोष्टी आवडतात!" तिच्या या पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येते की ती तिच्या डेटिंगबद्दलच्या अफवांना सावधगिरीने घेत असून तिने विनोदी थट्टा करत यावर उत्तर दिले आहे. 

हेही वाचा-Bollywood News : अभिनेत्रीने पतीविरुद्ध दाखल केला खटला! 50 कोटींची मागणी करत मुलांबाबत घेतला मोठा निर्णय

मृणालचे नाव धनुष्यासोबत जोडण्यामागे कारण काय?
ऑगस्टमध्ये "सन ऑफ सरदार 2" च्या प्रीमियरमध्ये मृणाल ठाकूर आणि धनुष एकत्र दिसले होते. धनुष तिच्या बहिणींना इंस्टाग्रामवर फॉलो करत असल्यामुळे डेटिंगच्या चर्चांनी जोर धरुन ठेवला. 
अलीकडेच, धनुषच्या "तेरे इश्क में" चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलिज झाला आहे. यामुळे मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असून धनुषचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे हा क्रिकेटपटू आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या वनडे सीरिजमध्ये श्रेयस नुकताच भारताचा उपकर्णधार दिसला होता. या सीरिजमध्ये त्याला गंभीर दुखापत झालेली. आता एकीकडे त्याच्या प्रकृतीच्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे त्याच्या डेटिंगच्या चर्चानी जोर धरलाय.

मृणालने अनेक साऊथच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सोबतच ती बॉलिवूडमध्येही झळकली आहे. सध्या "दो दिवाने शहर में" या तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या कामात आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच "सन ऑफ सरदार 2" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 150 कोटी म्हणजेच बजेटच्या तुलनेत फक्त 65.75 कोटी कमाई करू शकला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number