शिवजयंतीवरील निर्बंधांच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये शिवप्रेमी आक्रमक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंतीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर सरकारने लावलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ उस्मानाबादमधील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, उस्मानाबाद  जिल्ह्यातील शिराढोन हे गाव बंद करत शिवप्रेमींनी निषेध नोंदविला आहे. राज्य सरकारने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी सायकल रॅली, प्रभात फेरी, दुचाकी रॅली काढू नये अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिल्यामुळे जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या […]

शिवजयंतीवरील निर्बंधांच्या निषेधार्थ उस्मानाबादमध्ये शिवप्रेमी आक्रमक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंतीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर सरकारने लावलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ उस्मानाबादमधील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, उस्मानाबाद  जिल्ह्यातील शिराढोन हे गाव बंद करत शिवप्रेमींनी निषेध नोंदविला आहे. राज्य सरकारने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी सायकल रॅली, प्रभात फेरी, दुचाकी रॅली काढू नये अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिल्यामुळे जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

मनपा पथकाने शिवजयंतीचे बॅनर काढले

शिवजयंतीच्या मुहूर्तावर औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. त्यासाठी शिवप्रेमी आणि राजकीय पक्षांनी शुभेच्छ देणार बॅनर लावले. मात्र, औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाकडून मध्यरात्री शिवजयंतीसाठी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आले. त्यामुळे ही माहिती मिळताच शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शीवप्रेमींनी क्रांती चौकात धाव घेतली. तसेच शिवप्रेमींनी मनपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शिवजयंती उत्सवाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. तसेच आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number