छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवनेरी कल्ल्यावर शिवरायांच्या जन्मसोहळ्याला उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीला फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
शिवजयंती साजरी करताना आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्यांचे विचार कसे आत्मसात करू शकतो, शिवरायांच्या स्वराज्यातून आपण काय घ्यायला हवे हे पाहण्याची गरज आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ राज्यापूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात जगभरात साजरा केला जातो. यंदा कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्याने स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शिवजयंती निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कयेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते.