बादशाहाच्या गाण्यावर शिवभक्त नाराज

प्रसिद्ध रॅपर बादशाहाचे चाहते जगभर पसरलेले आहेत. गेल्या महिन्यात बादशाहाचे ‘सनक’ हे नवीन गाणं जवळपास प्रदर्शित झालं होतं. गाणं प्रदर्शित होताच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि चाहत्यांनी या गाण्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र आता एक महिन्यानंतर या गाण्यावरून वाद निर्माण झाला असून आता बादशाहच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. अलीकडेच प्रदर्शित […]

बादशाहाच्या गाण्यावर शिवभक्त नाराज

प्रसिद्ध रॅपर बादशाहाचे चाहते जगभर पसरलेले आहेत. गेल्या महिन्यात बादशाहाचे ‘सनक’ हे नवीन गाणं जवळपास प्रदर्शित झालं होतं. गाणं प्रदर्शित होताच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि चाहत्यांनी या गाण्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र आता एक महिन्यानंतर या गाण्यावरून वाद निर्माण झाला असून आता बादशाहच्या विरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सनक हे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिराच्या एका ज्येष्ठ पुजाऱ्यांनी बादशाहच्या या गाण्यावर आक्षेप घेतलाय. या गाण्यात भगवान शिव यांच्या नावाने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केळ्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे. पुजाऱ्यांनी सांगितलं की,’बादशाहने आपल्या गाण्यातून भगवान शिवचं नाव काढून टाकून जाहीर माफी मागावी. अथवा बादशाहा विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.हिंदू संघटनांसह महाकाल सेना आणि पुजारी महासंघाने देखील या गाण्यातून भगवान शिवचे नाव तात्काळ हटवण्याची मागणी केली. परंतु अद्याप बादशाहाच्या टीमकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number