‘शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार’

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. नरहरी झिरवळ कुठे गेले? झिरवळ गायब होण्यामागचं कारण काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याने […]

‘शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार’

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. नरहरी झिरवळ कुठे गेले? झिरवळ गायब होण्यामागचं कारण काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याने एकच खळबळ उडाली होती. तर त्यांना संपर्क साधला तरीही त्यांचे दोन्ही फोन लागले नाहीत. तर ते गावच्या घरीही उपस्थित नव्हते. अशातच, काही तासभरातच नरहरी झिरवळ माध्यमांसमोर आले. मी कुठेच गेलो नव्हतो. इथेच आहे. फक्त मोबाईलला रेंज नसल्याने मोबाईल लागत नव्हता, असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं भाकीतही केल. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, झिरवळ नॉट रिचेबल असल्याचे समजताच खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ…जय महाराष्ट्र!’ अशा आशयाचे ट्वीट राऊत यांनी केलं आहे. हे ट्वीट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number