बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधानांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी अब्दुल्ला अल मामुन यांच्याविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याच्या प्रकरणात सुनावणी पूर्ण केली आणि शिक्षा जाहीर केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये तणाव निर्माण झाला आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने देशव्यापी बंदची हाक दिली आहे.