शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. शनिवार (१९ नोव्हेंबर) आणि रविवार (२० नोव्हेंबर) या दोन दिवसांचा शरद पवारांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरिक्षक आशिष मानकर यांनी दिली आहे.   शरद पवार […]

शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. शनिवार (१९ नोव्हेंबर) आणि रविवार (२० नोव्हेंबर) या दोन दिवसांचा शरद पवारांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरिक्षक आशिष मानकर यांनी दिली आहे.

  शरद पवार आता गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. हा दौरा केल्यानंतर ते यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा करणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

  महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने आता निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भ दौरा करत आहेत. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे या भाजपच्या गडातच शरद पवारांचा चार दिवसांचा दौरा करणार आहेत. आता ते चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. मात्र यानंतरचा त्यांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्हाचा दौरा रद्द झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number