शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मांडली शेतक-यांची व्यथा

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा थैमान घातलयं या परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दुष्काळग्रस्त भागांना भेट दिली. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याच्या दोन दिवसांच्या दौ-यावर शरद पवारांनी नांदेड,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,तुळजापूर अशा अनेक भागांची पडताळणी केली. शेती नुकसानीच्या पाहणी दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले. काही भागांमध्ये मोठ्या […]

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मांडली शेतक-यांची व्यथा

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा थैमान घातलयं या परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दुष्काळग्रस्त भागांना भेट दिली. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याच्या दोन दिवसांच्या दौ-यावर शरद पवारांनी नांदेड,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,तुळजापूर अशा अनेक भागांची पडताळणी केली.

शेती नुकसानीच्या पाहणी दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी अनेक मुद्दे मांडले. काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच सोयाबीन पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकांवर देखील झाला आहे चिखल खूप असल्यामुळे ऊस तोडणी करता येणार नाही असं देखील स्पष्ट केलं आहे. साखर कारखानदारी लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळेल. तसेच काही जिल्ह्यांमध्ये रस्त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जमिनींचे बांध फुटले आहेत, तसेच अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी स्पष्ट केल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  भेट घेऊन कर्ज काढण्याचा आग्रह करणार असल्याचं पत्रकार परिषदेत मांडलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number