‘तुम्हाला जिथे जायचे तिथे जा…’ शरद पवार यांची संतप्त प्रतिक्रिया!

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार चांगलेच संतापले आहेत. “तुम्हाला कुठे जायचे तिथे जा”… अशी संतप्त प्रतिक्रिया पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली आहे. यावेळी एका नेत्यासंदर्भात घडलेली हकीकतही त्यांनी उदाहरणादाखल सांगितली. आपण एका नेत्याला भेटलो होते. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या चौकशीची नोटीस आल्यामुळे मला जाण्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. आपण त्याला तुम्ही कुठेही […]

‘तुम्हाला जिथे जायचे तिथे जा…’ शरद पवार यांची संतप्त प्रतिक्रिया!

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार चांगलेच संतापले आहेत. “तुम्हाला कुठे जायचे तिथे जा”… अशी संतप्त प्रतिक्रिया पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली आहे. यावेळी एका नेत्यासंदर्भात घडलेली हकीकतही त्यांनी उदाहरणादाखल सांगितली. आपण एका नेत्याला भेटलो होते. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या चौकशीची नोटीस आल्यामुळे मला जाण्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. आपण त्याला तुम्ही कुठेही जा असं  सांगितल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचा टोला

पक्ष सोडून गेलेल्यांवर शरद पवार यांनी बोचरी टीका केली आहे. Tweet करत पक्ष सोडून गेलेल्यांवर  टिका केली, तसंच मी 52 वर्षांपासून निवडून येतोय, हा माझा विक्रम आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात 1957 साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापुरात काँग्रेस जिंकली होती असं ही Tweet मधून शरद पवार यांनी म्हटलं आहे.

टीका करत असताना कोणाच्याही नावाचा उल्लेख शरद पवार यांनी केलेला नाही. त्यामुळे पद्मसिंह पाटील उदयनराजे किंवा राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना पवार यांच्यावरही नाव न घेता त्यांनी टीका केली.

पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर पवारांनी प्रथम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेत उस्मानाबादमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत राणा पाटील व पद्मसिंह पाटील यांच्यावर तोफ डागली.

विकासाचं कारण दाखवत पक्ष सोडला, मग इतके दिवस का पक्षात होता? असा प्रश्न पवारांनी विचारला आहे.

डॉ पाटील व शरद पवार जवळचे नातेवाईक आहेत.

पुढील काळात पाटील पवार कुटुंबाची लढाई अधिकच तीव्र होईल असे संकेत दिसून येत आहेत .

पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहासजमा होणार आहेत. ‘मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजाडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा. सत्ता येते-जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा हा विक्रम आहे.’ असं शरद पवार यांनी म्हटलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number