शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात ‘या’ राशी होणार मालामाल

शनीदेव नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतात. तर, इतरांना छळणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शिवाय, शनीचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते.

शनीदेव आहेत मेहरबान! मग चिंता कसली.. पुढच्या दीड महिन्यात ‘या’ राशी होणार मालामाल

Shani rashi parivartan 2025: ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना खूप महत्त्वाचे स्तान आहे. शनी  ग्रहाला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनीदेव नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतात. तर, इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वांत मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे शनीदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत पोहोचण्यास म्हणजे गोचर करण्यास अडीच वर्षांचा कालवधी लागतो.

2025 मध्ये शनीदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, 17 जानेवारी 2023 रोजी शनीदेवांनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनीचा स्वराशीतील प्रवेश 12 राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरला. आता केवळ 47 दिवस शनी स्वराशीत राहणार असून त्यानंतर ते मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणारे 47 दिवस काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होतील.

हेही वाचा – या 5 राशींचे लोक असतात खूप उधळपट्टी करणारे! कधीही बचतीकडे लक्ष नसतं

तीन राशींना शनीदेव करणार मालामाल

मकर
शनीदेवांचे कुंभ राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

कुंभ
शनीदेवांचे कुंभ राशीतील गोचर पुढील काही दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

हेही वाचा – पपईच्या बिया फेकून देताय? जरा थांबा.. मधुमेहापासून कोलेस्टेरॉलपर्यंत सर्वांवर आहेत गुणकारी, 'अशा' पद्धतीने खा

वृषभ
पुढील 47 दिवस शनीदेवां    चे कुंभ राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number