Shah Rukh Khan Controversy: किंग खानला ‘अंकल’ म्हणणं पडलं महागात! अभिनेत्रीवर संतप्त चाहत्यांचा हल्लाबोल

Joy Awards 2026 दरम्यान शाहरुख खानला ‘अंकल’ म्हणणाऱ्या तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेलवर नेटकऱ्यांचा रोष. व्

Shah Rukh Khan Controversy: किंग खानला ‘अंकल’ म्हणणं पडलं महागात! अभिनेत्रीवर संतप्त चाहत्यांचा हल्लाबोल

Shah Rukh Khan Controversy: बॉलिवूड म्हटलं की सर्वप्रथम ज्याचं नाव डोळ्यांसमोर येतं, तो म्हणजे शाहरुख खान. रोमान्सचा बादशाह, किंग खान, जागतिक सुपरस्टार अशी ओळख असलेल्या शाहरुखचे चाहते केवळ भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधींच्या संख्येने आहेत. त्याची स्टाइल, संवादफेक आणि चार्म आजही तरुण पिढीला भुरळ घालतो. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे शाहरुख खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

रियाधमध्ये पार पडलेल्या Joy Awards 2026 सोहळ्यासाठी शाहरुख खान उपस्थित होता. या पुरस्कार सोहळ्यात त्याची एन्ट्री, लूक आणि आत्मविश्वास पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. याच कार्यक्रमात इजिप्शियन अभिनेत्री अमीना खलील देखील शाहरुखसोबत स्टेजवर दिसली. या दरम्यान तुर्की अभिनेत्री Hande Erçel तिच्या मोबाईलमध्ये हा क्षण रेकॉर्ड करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी Hande ही शाहरुखची मोठी चाहती असल्याच्या चर्चा सुरू केल्या. मात्र याच चर्चांना वेगळं वळण देणारी गोष्ट त्यानंतर घडली. Hande Erçel हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शाहरुख आणि अमीना यांचा स्टेजवरील फोटो शेअर करत धक्कादायक कॅप्शन लिहिलं—
“कौन है ये अंकल?”

या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर अक्षरशः वादळ उठलं. शाहरुखसारख्या जागतिक स्टारला ‘अंकल’ म्हणणं अनेक चाहत्यांना खटकले. एवढंच नव्हे तर तिने पुढे स्पष्टीकरण देताना, आपण शाहरुखची चाहती नसल्याचं आणि फक्त मैत्रीण अमीनाचा व्हिडीओ शूट करत असल्याचं सांगितलं. तसेच, खोट्या अफवा पसरवू नयेत असंही तिने नमूद केलं.

मात्र हे स्पष्टीकरण चाहत्यांना रुचले नाही. काही वेळातच तिची ही इंस्टा स्टोरी डिलीट करण्यात आली, पण तोपर्यंत स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी Hande वर जोरदार टीका सुरू केली. “तुझ्या अख्ख्या करिअरपेक्षा शाहरुखचा एक चित्रपट मोठा आहे,” अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने, “शाहरुखला अंकल म्हणतेस, पण तू त्याच्यापेक्षा वयस्कर दिसतेस,” असा टोला लगावला.

काही युजर्सनी मात्र ही पोस्ट बनावट असल्याचा दावाही केला आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबद्दल अशा शब्दांत बोलणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. या संपूर्ण वादामुळे सोशल मीडियावर शाहरुख खान पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला.

विशेष म्हणजे, Hande Erçel हिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं ती यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’साठी तिचं नाव चर्चेत होतं, तसेच आमिर खान आणि हृतिक रोशनसोबत काम करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली होती. त्यामुळेच अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे 'जर तिला बॉलिवूड आणि त्यातील कलाकारांची इतकी माहिती आहे, तर शाहरुख खान तिला कसा माहीत नाही?'

एका इंस्टा स्टोरीमुळे निर्माण झालेला हा वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, किंग खानच्या चाहत्यांचा संताप अजूनही शांत झालेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number