अकोल्यात झाड कोसळून सात जणांचा मृत्यू

ऐन उन्हाळाच्या दिवसांत अवकाळी आणि गारपीटीने राज्याला झोडपून काढलं आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठं नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. अशातच, अकोल्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पारस गावात मंदिरावर लिंबाचं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून २० ते २५ भाविक जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही […]

अकोल्यात झाड कोसळून सात जणांचा मृत्यू

ऐन उन्हाळाच्या दिवसांत अवकाळी आणि गारपीटीने राज्याला झोडपून काढलं आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठं नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. अशातच, अकोल्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पारस गावात मंदिरावर लिंबाचं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून २० ते २५ भाविक जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गाव रविवारी हादरले आहे. पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी भाविकांची गर्दी असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास मंदिरात आरती झाली. त्याचदरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावासाला सुरुवात झाली. त्यामुळे मंदिराच्या बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या शेडचा सहारा घेतला. त्याचवेळी मंदिरासमोरील झाड शेडवर कोसळल आणि मोठी दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. मात्र, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे बचाव कार्यासाठी अडथळा येत होता.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बाहेर असलेल्या नागरिकांनी मंदिराच्या शेडचा सहारा घेतला. त्याचवेळी मंदिरासमोरील लिंबाचं झाड शेडवर कोसळलं. आणि शेडही कोसळंल. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर २९ भाविक जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील सर्व २९ जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number