Sergio Gor: सेर्जिओ गोर यांनी भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला; भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याचा निर्धार व्यक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोर यांच्यावर भारताशी असलेले राजनैतिक, सुरक्षा आणि व्यापार विषयक संबंध अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

Sergio Gor: सेर्जिओ गोर यांनी भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला; भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याचा निर्धार व्यक्त

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवे भारतातील राजदूत सेर्जिओ गोर यांनी बुधवारी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला असून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची ग्वाही दिली आहे. या जबाबदारीबद्दल त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. सेर्जिओ गोर यांनी सामाजिक माध्यमावर लिहिले की, “भारतासाठी नवे राजदूत म्हणून काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि तो विश्वास राखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन.”

मंगळवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, “सेर्जिओ गोर यांच्यावर मी भारताशी असलेले रणनीतिक, आर्थिक आणि सुरक्षा संबंध अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवत आहे. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे अतिशय चांगले संबंध आहेत. सेर्जिओ गोर यांची नियुक्ती या नात्याला आणखी बळकटी देईल.” ट्रम्प पुढे म्हणाले, “भारताशी आमचे संबंध हे अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणातील एक प्रमुख घटक आहेत. भारतात जगातील सर्वात जलद वाढणारा मध्यमवर्ग आहे आणि सेर्जिओ गोर तिथे नक्कीच यशस्वी होतील, याची मला खात्री आहे.”

हेही वाचा: Facebook: गायब होणार फेसबुकचे ‘लाइक’ बटण! वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का

राजदूत म्हणून गोर यांच्यावर दोन्ही देशांमधील गुंतवणूक, ऊर्जा निर्यात आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याची जबाबदारी असेल. तसेच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांसाठी नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्याचेही उद्दिष्ट आहे. शपथ घेतल्यानंतर गोर म्हणाले, “या जबाबदारीबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार. भारत आणि अमेरिका यांच्यातील नातं अधिक बळकट करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.” ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी गोर यांची दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणून नियुक्ती केली होती.

सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र समितीसमोर साक्ष देताना त्यांनी भारत-अमेरिका संबंधांना “जगातील सर्वात महत्त्वाच्या भागीदारींपैकी एक” असे संबोधले होते. शपथविधीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी भारत दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली होती. या भेटीत द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली होती.

हेही वाचा: Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटातील पीडितांसाठी भरपाई जाहीर; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number