अमरावतीत ४ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या […]

अमरावतीत ४ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शाळा येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जंगल सफारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने दिला आहे.

राज्यात पुन्ह एकदा कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. दरम्यान काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात  आले. तसेच राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला. राज्यात अनेक जिल्ह्यात शाळेची घंटा पुन्हा वाजली. परंतु अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याच निर्णय प्रशासनाने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number