कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यात सोमवार १३ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचा निर्णय शालेय मंत्री वर्षा गायकवाड दिला आहे. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या. मात्र, विदर्भात शाळेची घंटा २९ जूनला वाजणार आहे. राज्यातील वाढते तापमान वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शाळा २९ जूनपासून सुरू होणार असल्याच्या निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
६ जून रोजी चिखलदरामधील कालापांढरी गावातील शाळेचे छत चक्रीवादळामुळे उडाले होते. मात्र, कालापांढरी शाळा अद्याप नादुरुस्त आहे. त्यामुळे २७ जूनपासून अमरावतीमधील शाळा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या शाळेतील विद्यार्थ्यांनी भर पावसात शिक्षण कसे घ्यायचे असा प्रश्न विद्यार्थ्यी आणि पालकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच संबंधित विभागाने काळजी न घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.